S M L

1 कोटी 92 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राज्यमंत्री दिलीप कांबळेंविरोधात गुन्हा

राज्यमंत्र्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल आल्याने सरकावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

Updated On: Mar 28, 2019 09:55 PM IST

1 कोटी 92 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राज्यमंत्री दिलीप कांबळेंविरोधात गुन्हा

मुंबई, 28 मार्च : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याविरोधात कोर्टाच्या आदेशावरून औरंगाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्यासाठी एक कोटी 92 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दिलीप कांबळे आणि अन्य चार जणांवर आहे.

औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांत याप्रकरणी  गुन्हा दाखल झाला आहे. राज्यमंत्र्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल आल्याने सरकावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने याबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे काँग्रेसचं म्हणणं?


राज्यातील भाजपचं सरकार ही अलिबाबा आणि 40 चोरांची टोळी असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. तसंच दिलीप कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

'चौकीदार ही चोर है ही घोषणा किती यथार्थ आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडे पाहिल्यावर समजून येतं. राज्यातील दिलीप कांबळे या मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी टोळीने लाचखोरी करून लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने दिलीप कांबळेंवर गुन्हा करणायाच्या दिलेल्या आदेशाने हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ आहे की अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी?' असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.


Loading...

SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगातबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 09:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close