एकनाथ खडसेंचा पाय खोलात, भूखंड प्रकरणी गुन्हा दाखल

बंडगार्डन पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनाही याप्रकरणात सहआरोपी करण्यात आलंय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2017 08:27 PM IST

एकनाथ खडसेंचा पाय खोलात, भूखंड प्रकरणी गुन्हा दाखल

10 एप्रिल : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का बसलाय.खडसेंच्या विरोधात अखेर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. बंडगार्डन पोलीस ठाण्यात खडसेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. खडसेंच्या पत्नी आणि जावई यांनाही याप्रकरणात सहआरोपी करण्यात आलंय.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन आपल्या नातेवाईकांना दिल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात एकनाथ खडसे यांची उलटतपासणी घेण्यात आली होती.

भोसरी इथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन कोटय़वधी रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून केवळ 3 कोटी 75 लाख रुपयांमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी जावयाच्या नावावर खरेदी केली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यातले बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण ?

भोसरी एमआयडीसीतील सर्व्हे नंबर 52, हिस्सा नंबर 2 अ /2

Loading...

एकूण क्षेत्र 1 हेक्टर 21 आर म्हणजेच सुमारे 3 एकर...

ही जमीन एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या नावावर असून अब्बास रसूलभाई यांच्याकडून त्यांनी खरेदी केलीये. 28 एप्रिल 2016 रोजी हा व्यवहार झालाय. त्यासाठी जमीन मालकाला 3 कोटी 75 लाख रुपये देण्यात आलेत.  खडसेंच्या कुटुंबीयांनी खरेदी केलेली जमीन एमआयडीसीसाठी ताब्यात घेण्यात आलीय. त्यामुळे त्या जमिनीवर एमआयडीसीची मालकी आहे. असं असताना एमआयडीसीला अंधारात ठेवून मुळ मालकानं ही जमीन विकली आणि खडसेंच्या कुटुंबीयांनी ती विकत घेतली. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर करून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी केलाय.

या जमिनीबाबत मुळ मालक आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात आधीपासूनच वाद आहे. सध्या ते प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्याचा निकाल लागण्या आधीच जमिनीचा व्यवहार करण्यात आलाय.

या जमिनीचा व्यवहार 3 कोटी 75 लाखांत झाला असला तरी आजच्या बाजार भावानुसार तिची किंमत 40 कोटींवर आहे. विशेष म्हणजे मुद्रांक तसंच नोंदणी विभागानंदेखील जमिनीच्या मालकीबाबत शहानिशा केली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2017 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...