S M L

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करा - राज्य सरकारचे आदेश

तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तपासाची सूत्र पोलीस निरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच देण्याचे आदेश ही या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 18, 2017 08:58 AM IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करा - राज्य सरकारचे आदेश

मुंबई,18 सप्टेंबर: शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांचा तपास पोलिसांनी एका आठवड्यात पूर्ण करावा, असं परिपत्रकच राज्य सरकारनं काढलं आहे. तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तपासाची सूत्र पोलीस निरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच देण्याचे आदेश ही या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासंबधी बैठक घेण्यात आली. यासंदर्भात सुचनाही करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांच्या मृत्यूचं कारण तात्काळ शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष द्यावं असे निर्देशही या पत्रकातून देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेनं दोन दिवसात आपला अहवाल पोलिसांना सोपवावा असे आदेशही या परिपत्रकातून देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यास मदतच होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 08:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close