S M L

कोपर्डी खटल्यात अंतिम युक्तिवाद आजपासून

26 ते 28 आणि 29 तारखेला शनिवारी आणि रविवारीही सुनावणी घेण्याचा न्यायालयाचा विचार आहे. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात कोपर्डी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 26, 2017 12:57 PM IST

कोपर्डी खटल्यात अंतिम युक्तिवाद आजपासून

अहमदनगर,26 ऑक्टोबर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खटल्यात आज युक्तीवादास सुरूवात होणार आहे. गेल्या सुनावणीत 26 ऑक्टोबरपर्यंत पुढं ढकलण्यात आली होती. त्यामुळं शनिवारी आणि रविवारीही सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोपर्डी खटल्यात आरोपीचे वकील गैरहजर राहिल्यानं सुनावणी पुढं ढकलण्यात आली होती.

26 ऑक्टोबरला पुढील सुनावणी घेण्यात येत आहे. त्यामुळं कोपर्डी खटल्याचा अंतीम युक्तिवाद ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण होण्याची शक्यता आहे. कोपर्डी खटल्याच्या अंतीम युक्तिवादाला जिल्हा सञ न्यायालयात बुधवार पासून सुरुवात होणार होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, आरोपीचे वकील योहान मकासरे आणि प्रकाश अहेर न्यायालयात हजर झाले मात्र आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे हे गैरहजर राहिले. त्यामुळे आजपासून अंतिम युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. 26 ते 28 आणि 29 तारखेला शनिवारी आणि रविवारीही सुनावणी घेण्याचा न्यायालयाचा विचार आहे. त्यामुळं नोव्हेंबर महिन्यात कोपर्डी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेवर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्येचा गंभीर आरोप ठेवण्यात आलाय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युक्तिवाद करतील. त्यानंतर आरोपींचे वकिल युक्तिवाद करतील.

13 जुलै 2016ला कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात  आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 11:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close