भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

न्यू कोपरे गाव पुनर्वसन प्रकरणी फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणे असा आरोप काकडेंवर करण्यात आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 06:47 PM IST

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे,१६ सप्टेंबर : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू कोपरे गाव पुनर्वसन प्रकरणी

फसवणूक करणे, शासनाची दिशाभूल करणे असा आरोप काकडेंवर करण्यात आलाय.

पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून सतरा एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन बळकावल्याच्या आरोप काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादवसह आणखी एकावर आहे.

या प्रकरणी शनिवारी रात्री कोपरे पोलीस स्टेशनमध्ये संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 06:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...