तरुणांच्या 2 गटांत पिस्तुल, तलवारीने तुफान हाणामारी, गोळ्या लागून 3 जण जखमी

या हाणामारीत गावठी पिस्तूलचा वापर करून गोळीबार झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 03:50 PM IST

तरुणांच्या 2 गटांत पिस्तुल, तलवारीने तुफान हाणामारी, गोळ्या लागून 3 जण जखमी

उस्मानाबाद, 07 जुलै : उस्मानाबाद कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारधी समाजातील 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत गावठी पिस्तूलचा वापर करून गोळीबार झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेमुळे शहरातील वातावरण तंग झालं होतं. तुफान दगडफेकीमुळे भीतीपोटी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली होती. येथील पारधी पिढीवर या समाजाचं कार्यक्रम होता. यामध्ये मद्यप्राशन केलेल्या तरूणांची बाचाबाची सुरू झाली. सायंकाळच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक सुरू झाली.

पोलिसांसमक्ष देखील ही हाणामारी सुरू होती. यातील एका गटाने गावठी पिस्तूलीच्या 5 गोळ्या झाडल्या. या गोळ्या 3 तरुणांना लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचार करून जखमींना अंबाजोगाई येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

यामध्ये विकास बापु पवार आणि राहुल बापु पवार, बापु विष्णू धोञे यांना गोळी लागली आहे. भांडणात दगड, तलवारी, कोयते, काठ्या, साखळ्या याचा वापर उघडपणे चालू होता. या भांडणाची सुरुवात मार्केट कमिटीच्या आवारातून सुरू झाली.

यामध्ये पारधी समाजाच्या महिलांची आक्रमक भूमिका होती या महिलांना अडवण्यासाठी महिला पोलिस उपस्थित नव्हते. शहरातील या समाजाकडे अवैधरित्या गावठी पिस्तुलं, तलवारी कुठून आल्या? याची उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी या जमावावर नियंत्रण ठेवलं.

Loading...

परिस्थिती आटोक्याबाहेर दिसताच उपविभागीय पोलीस अधिकारी कटेकर यांनी तालुक्यातील पोलीस ठाण्यांना संपर्क साधून पोलीस कर्मचारी शहरात तैनात केले. त्यानंतर आता परिसरात भीतीचं वातावरण आहे.

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...