नवनीत राणांना काँग्रेस-राष्ट्रवादी देणार का पाठिंबा?

अमरावतीमध्ये देखील लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 04:04 PM IST

नवनीत राणांना काँग्रेस-राष्ट्रवादी देणार का पाठिंबा?

अमरावती, संजय शेंडे 17 मार्च : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता लक्षवेधी लढतीत आणखी एका मतदारसंघाची भर पडली आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात 2014मध्ये आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा सामना रंगला होता. त्याचप्रमाणे 2019मध्ये देखील आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असाच सामना रंगणार आहे. कारण, शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांचे आव्हान असणार आहे. नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांना युवा स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या युवा स्वाभिमान पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती शरद पवार आणि अजित पवार यांना केली. आमची विनंती शरद पवारांनी मान्य केली असून येत्या 3 ते 4 दिवसात आघाडीची उमेदवार म्हणून माझे नाव जाहीर होईल, असे नवनीत राणा यांनी सांगितले. काँग्रेस -राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा म्हणून नवनीत यांचे पती आमदार रवी राणा यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठका देखील झाल्या.


जातीवाद पेरण्याचं काम का करताय? रिपब्लिकन नेत्याची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका


Loading...

आनंदराव अडसूळ यांच्यावर टीका

गेली 5 वर्षे भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेनेने त्यांच्या पोस्टरवरून मोदींचे फोटो काढून टाकले होते. आता युती होताच बाळ ठाकरे यांच्या जागी मोदींचे फोटो हे लावत आहेत. यावरून त्यांची मानसिकता काम करण्यापेक्षा पोस्टरबाजीद्वारे मत मागण्याची अधिक असल्याचे दिसून येते.

यावेळी मी किंवा माझे कार्यकर्ते नाही, तर मतदान करणारा मतदार ज्या व्यक्तीचे अमरावतीशी नाते नाही, ज्यांचे अमरावतीत घर नाही अशा व्यक्तीला अमरावती जिल्ह्याबाहेर पाठवणार, अशा शब्दात नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर टिका केली.


स्फोट घडवून उध्वस्त केल्या वाळू माफियांच्या बोटी; LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...