देहूत महिलांच्या शौचालयात सापडले स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक

देहूरोड शहरातील गांधीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 02:58 PM IST

देहूत महिलांच्या शौचालयात सापडले स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक

देहूरोड,17 जून- देहूरोड शहरातील गांधीनगर येथील महिलांच्या सार्वजनिक शौचालयात स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (17 जून) पहाटे ही घटना उघडकीस आली.

स्त्री जातीच्या मृत नवजात अर्भकाची पूर्ण वाढ झालेले आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. मागील महिण्यातही याच भागात नाल्यामध्ये मृत नवजात अर्भक आढळून आले होते. त्यामुळे स्थानिक नागरीकांत संताप व्यक्त केला आहे. देहुरोड पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

पुण्यात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात नळस्टॉप चौकाजवळ रविवारी ही घटना घडली. या प्रकरणी अलंकार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कदम असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऑनलाइन दिलेली जेवणाची ऑर्डर घेऊन प्रवीण डिलिव्हरी करण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला. ग्राहकाने ऑर्डर कॅन्सल करण्यास सांगितले. त्यावर ऑर्डर रद्द होऊ शकत नाही, असे प्रवीणने सांगितल्यावर 5 ते 6 जणांनी त्याला दांडक्याने मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांत गुन्हा दाखल होताच मारहाण करणारे आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


Loading...

VIDEO: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला टोळक्याकडून बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...