फसव्या जाहिराती करून बेकायदा औषध उत्पादकांविरोधात FDA ची कारवाई

राज्यभरात सुमारे 33 ठिकाणी छापे टाकून अशा प्रकारच्या बेकायदा औषधांचा 20 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 10:27 PM IST

फसव्या जाहिराती करून बेकायदा औषध उत्पादकांविरोधात FDA ची कारवाई

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 26 जुलै- उंची वाढवणे, सांधेवात बरा करणे, वजन घटवणे, पुरुषांची यौनशक्ती वाढवणे, अस्थमा बरा करणे, स्त्रियांशी संबंधित आजार या सारख्या फसव्या जाहिराती करणाऱ्या जाहिरातदार कंपनी आणि औषध उत्पादकांविरोधात राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे, ही कारवाई करण्यासाठी तब्बल दोन महिने धाड सत्र अभियान राबवण्यात आले.

राज्यभरात सुमारे 33 ठिकाणी छापे टाकून अशा प्रकारच्या बेकायदा औषधांचा 20 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर तब्बल 167 प्रकारच्या आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उत्पादकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना औषध व जादुटोणा उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 नुसार एकाच वेळी कायदेशीर कारवाई केल्याची माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली आहे. कायद्यानुसार काही विशिष्ट आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या गुणधर्माबाबत जाहिरातबाजी करण्यास प्रतिबंधित असताना देखील जाहिराती करून औषधींची सर्रास विक्री करण्यात येत होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे नागरिकांनी कोणत्याही फसव्या जाहिराती आणि औषधांबाबत तक्रार असल्यास त्यांनी FDAशी संपर्क साधण्याचे आहवानही डॉ. दराडे यांनी केले आहे.

VIDEO : मुंबईकरांनो, पुढचे चार दिवस काळजी घ्या; हवामान विभागाने दिला मोठा इशारा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...