शेतजमिनीच्या वाटणीवरून मुलाने बापाची हत्या करून कुत्र्यांना खाऊ घातले मांस

जमिनीच्या वादातून मुलाने जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या करून कुत्र्यांना मांस खाऊ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 06:55 PM IST

शेतजमिनीच्या वाटणीवरून मुलाने बापाची हत्या करून कुत्र्यांना खाऊ घातले मांस

यवतमाळ, 26 जुलै- जमिनीच्या वादातून मुलाने जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या करून कुत्र्यांना मांस खाऊ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी तालुक्यातील खापरी येथे गुरूवारी ही घटना घडली आहे. मुलानेच वडिलांकड शेती हिस्सेवाटणीचा तगादा लावला होता. यावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. दत्तू उरवते (67) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नामदेव उरवते (35) असे आरोपीचे नाव त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नामदेवला त्याच्या हिस्स्याची शेतजमीन हवी होती. त्यासाठी त्याने वडिलांकडे सारखा तगादा लावला होता. परंतु मी जिवंत असेपर्यंत वाटणी होणार नाही, असे वडिलांचे मत होते. त्यामुळे रागाच्या भरात नामदेवने वडिलांची हत्या केली. या घटनेने सर्व गाव हादरले आहे.

काही दिवसापासून शेतीच्या हिस्सेवाटणीवरून उरवते कुटुंबात वाद सुरू होता. दोन्ही बापलेकांनी रात्री एकत्र जेवण केले. वडील व आई हे आपल्या खोलीमध्ये झोपी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा नामदेव उठला आणि त्याने वडिलांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, विकृत पद्धतीने मुलाने दोन तास डोक्यावर वार केले. एवढेच नाही तर मृत वडिलांचे मांस त्याने कुत्र्यांनी खाऊ घातले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली. पोलीस पाटलांनी तातडीने पाटण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून गावात घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाटण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार अमोल बारापात्रे यांनी घटनास्थळ गाठून आरोपी नामदेव उरवते याला अटक केली. पोलीस आता सर्वच शक्यता पडताळून पाहत असून त्यांनी चौकशीला सुरुवातही केली आहे.

VIDEO : भररस्त्यावर कारने घेतला पेट, अखेर जवानांनी विझवली आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 06:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...