मुलगी झाली म्हणून 10 दिवसांच्या तान्हुलीला बापाने पाजले विष

मुलगी झाली म्हणून 10 दिवसांच्या तान्हुलीला बापाने पाजले विष

दुसरीही मुलगीच झाली याचा राग मनात धरून रामकिशन जाधव याने अवघ्या 10 दिवसांच्या मुलीला विषारी औषध पाजलं

  • Share this:

25 एप्रिल : आजच्या २१ व्या शतकात सुद्धा जेव्हा मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत असतांनाही मुली या ओझं वाटत असण्याची सडकी मानसिकता अजूनही जिवंत आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोराळा या गावातील एका नराधम पित्याने दुसरी मुलगी झाली म्हणून अवघ्या दहा दिवसांच्या मुलीला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असून या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रामकिसन शिवाजी जाधव याचा विवाह वाघी इथल्या अंजना हिच्या सोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. त्याना पहिले अपत्य मुलगी आहे. दहा दिवसांपूर्वीच त्यांना दुसरीही मुलगीच झाली. मुलगी झाली याचा राग मनात धरून रामकिशन जाधव सासरवाडीला भेटण्यासाठी गेला आणि अवघ्या 10 दिवसांच्या मुलीला विषारी औषध पाजलं.

यावेळी मुलगी अत्यवस्थ झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अंजना रामकिशन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामकिशन शिवाजी जाधव याच्या विरुद्ध कलम 307 नुसार कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या