दृष्टिहीन मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता 2 महिन्यांची गरोदर

मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 07:55 PM IST

दृष्टिहीन मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार, पीडिता 2 महिन्यांची गरोदर

नाशिक, 26 जुलै- मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटकही केली आहे.

अल्पवयीन पीडित मुलगी दृष्टिहीन असून एका आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. आश्रमशाळेच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि याच वैद्यकीय तपासणीत ही मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी संबंधित शिक्षकांनी या पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची माहिती दिली. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत दहा वर्षांची मुलगी बनली आई

मुंबईतला कामाठीपुरा देशभर कुख्यात आहे. याच कामाठीपुऱ्यातली एक 10 वर्षांची मुलगी आई झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीची आई सावत्र असूनच तिनेच या चिमुकलीला वेश्याव्यवसायात ढकलले होते. त्यातूनच ती गर्भवती राहिली. नंतर सावत्र आईने तिची घरातून हकालपट्टी केली. एका रेल्वे स्टेशनजवळ सामाजिक कार्यकर्त्यांना ती आढळून आली आणि पोलिसांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. माणुसकीला काळिमा फासणारी या चिमुकलीची सगळी कथा मन हेलावून टाकणारी आहे.

ही मुलगी पश्चिम बंगालमध्ये राहणारी आहे. वर्षभरापूर्वी तिच्या आईचे निधन झाले. नंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. दुर्दैवाने काही वर्षांनी तिच्या वडिलांचे निधन झाले. नंतर तिची सावत्र आई मुंबईत आली कामाठीपुऱ्यात दलालांच्या तावडीत सापडली. भाड्याने रुम देण्याचे अमिष दाखवून एका दलालाने तिला आपल्या घरात घेतले आणि नंतर त्या नराधमाने या 10 वर्षींच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातली.

Loading...

पैशाच्या लालसेने त्या सावत्र आईने त्या चिमुकलीला त्या नराधमाच्या हवाली केले. नंतर इतरही लोक येऊन वासनेची भूक भागवू लागले. ही मुलगी या गोष्टीसाठी विरोध करत असे त्यावेळी ही सावत्र आई तिच्या शरीरावर चटके देत होती. काही दिवसांनी ती चिमुकली गर्भवती राहिली. हे त्या सावत्र आईला समजले तेव्हा तिने त्या चिमुकलीला घरातून हाकलून दिले. गर्भावस्था म्हणजे काय असतं हेही त्या चिमुकलीला माहीत नव्हते. अशा अवस्थेत ती मध्य रेल्वेच्या एका स्टेशनवर भीक मागून काही दिवस पोट भरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांना या मुलीची असाहाय स्थिती लक्षात आली. त्यांनी जेव्हा तिची आस्थेने चौकशी केली तेव्हा त्यांना त्या मुलीने आपली सर्व करुण कहाणी सांगितली. वैद्यकीय तपासणीनंतर ती नऊ महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या सामाजिका कार्यकर्त्यांनी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आणि मुलीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केला. त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आहे. पीडितेने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कामाठीपुऱ्यातून तिची सावत्र आई आणि दलालाला अटक केली आहे.

VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीचे हेच ते नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, गुप्त बैठकीचा हा पुरावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...