वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले, बापाने मुलगा आणि मुलीला विष पाजलं

विष पाजण्यात आलेल्या दोन्ही मुलांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 12:29 PM IST

वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले, बापाने मुलगा आणि मुलीला विष पाजलं

नाशिक, 22 जुलै : वह्या आणि पुस्तकांसाठी पैसे मागितल्याने पित्यानेच आपल्या मुलांना विष पाजल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विष पाजण्यात आलेल्या दोन्ही मुलांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुलांची शाळा सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत. त्यामुळेच नाशिकच्या शिंदे पळसे गावात राहणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांकडे वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले. पण या मागणीवर संतापलेल्या मद्यधुंद बापाने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा क्रूर बाप एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या घरात असलेलं कीटकनाशक बळजबरीने मुलीच्या तोंडात ओतण्याचा प्रयत्न केला. वडील आपल्या बहिणीला विष पाजत असल्याचं दिसल्याने मुलाने त्याला विरोध केला. पण या बापाने आपल्या मुलालाही विष पाजलं.

शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. जन्मदात्या बापानेच केलेल्या या कृत्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

भरधाव कारनं दोघांना उडवलं, दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Jul 22, 2019 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...