बाप-लेकीच्या नात्याला काळिमा.. नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

आईच्या मृत्युनंतर पाल्यांचा सर्व काही बापच असतो. मात्र,बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना वाशीम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे गावात घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2019 05:25 PM IST

बाप-लेकीच्या नात्याला काळिमा.. नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

किशोर गोमाशे,

वाशिम, (24 जुलै)- आईच्या मृत्युनंतर पाल्यांचा सर्व काही बापच असतो. मात्र,बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना वाशीम जिल्ह्यातील कोंडाळा झामरे गावात घडली आहे. आपल्या 15 वर्षीय पोटच्या मुलीवर गेल्या महिन्या भरापासून बलात्कार करणाऱ्या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडीत मुलीने वाशीम ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आरोपी लक्ष्मीकांत काळे (नाव बदलले आहे) वाशीम तालुक्यातील कोंडाळा झामरे गावाचा रहिवासी आहे. तो 7 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईला गेला होता. दरम्यान मुंबई रेल्वे स्थानकावर लक्ष्मीकांत 2 वर्षांची मुलगी सापडली होती. लक्ष्मीकांत तिला कोंडाळा गावात घेऊन आला. मात्र, सांभाळ होत नसल्याने त्या 2 वर्षीय निष्पाप मुलीची गळा आवळून तिने हत्या केली. तिचा मृतदेह नाल्याकाठी पुरला होता. या हत्येची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी प्रेतबाहेर काढून त्याच्या विरोधात खटला दाखल केला. त्यामध्ये लक्ष्मीकांत 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती.

शिक्षा भोगल्यानंतर 2 महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता. शिक्षा भोगल्यानंतरही लक्ष्मीकांतची विकृती कमी झाली नाही. तो मागील एक महिन्यापासून पोटच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. मात्र, या घृणास्पद प्रकारची नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी पीडीत मुलीसह थेट वाशीम ग्रामीण पोलीस स्टेश गाठले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नराधम बापाला अटक केली. त्याची कोठडीमध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार योगिता भारद्वाज यांनी दिली आहे.

चोर पण प्रामाणिक असतो, एकदा हा VIDEO पाहाच!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...