विजय देसाई, विरार 30 जुलै : विरारमध्ये एका वासनांध सासऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कौटुंबीक नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने विरारमध्ये खळबळ उडालीय. हा सासरा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न करत असे. सुनेने हा प्रकार घरातल्या लोकांना सांगूनही तिला कुणी दाद देत नव्हतं. अखेर तिने हुशारी दाखवत हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि सभ्यतेचा बुरखा पांघरणाऱ्या सासऱ्याचे प्रताप उघड केले. गोविंद शेलार असं त्या नराधम सासऱ्याचं नाव आहे.
दीड कोटी खर्च करून बांधला बंधारा, एकाच पावसात वाहून गेला
विरारमध्ये सासरा आणि सुनेच्या नात्याला कलंक लावणारी लाजीवारणी घटना घडलीय. गेल्या आठवड्यापासून हा नराधम सासरा पीडित सुने सोबत लगट करीत होता. याची तक्रार तिने पतीकडे केली मात्र सर्वांनी तिला खोटे पाडले. मात्र चतुर सुनेने सासऱ्याचा पराक्रम मोबाईल मध्ये कैद करून घटनेचा पर्दाफाश केला. अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र महिलांच्या बाजूने ज्यांनी उभं राहावं अशी अपेक्षा असते अशा पोलिसांनीच हे प्रकरण घरातल्या घरात मिटवा असा सल्ला दिल्याची धक्कादाय गोष्ट सूनेने सांगितल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबात संशय व्यक्त करण्यात येतोय.
पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका
दरम्यान विरार पोलिसांनी आरोपी गोविंद शेलार याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास चालू आहे. महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. महिला जर धाडसाने तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागल्या तर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. मात्र घरच्या घरी प्रकरण मिटवा असं पोलीसच सांगत असतील तर महिलांनी कुठे जावं असा प्रश्न सामिजिक कार्यकर्ते विचारत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा