जावयाने केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू, पैठण तालुक्यातील घटना

जावयाने केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मुत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे घडली आहे. संतोष माळी असे मृत सासऱ्याचे नाव आहे. ते शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य होते.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 08:08 PM IST

जावयाने केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू, पैठण तालुक्यातील घटना

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 19 जुलै-जावयाने केलेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील इसारवाडी येथे घडली आहे. संतोष माळी असे मृत सासऱ्याचे नाव आहे. ते शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य होते. बाळु शिंदे असे आरोपी जावयाचे नाव आहे.

संतोष माळी यांच्या मुलीचा विवाह गावातील बाळु शिदे यांच्या सोबत तीन वर्षापूर्वी झाला होता. मात्र, माळी याची मुलगी मुखबधीर असल्याने तिचा पती, सासरा, सासू तिचा छळ करत होती. याच कारणावरुन 16 जुलै रोजी माळी व शिंदे परीवारात लाठ्याकाठ्या व लोखंडी गजाने जोरदार हाणामारी झाली. मारहाणीत जावई बाळु शिंदे याने सासरे संतोष माळी यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला केला. डोक्याला जबर मारहाण झाल्याने माळी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी संतोष माळी यांचे उपचारादरम्यान निधन झाले. याप्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी जावई  बाळु शिंदे, गोकुळ शिंदे, आकाश शिंदे, नागु शिंदे, या चौघांना अटक केली असून दोन जण फरार झाले आहेत.

मुस्लिम तरुणाला अडवून केली मारहाण, 'जय श्रीराम' म्हणण्यासही पाडले भाग

कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. इम्रान पटेल (वय-28) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता त्याला 8 ते 10 तरुणांच्या टोळक्याने अडवले. त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यासही भाग पाडले. इम्रान याने तीन वेळा 'जय श्रीराम' म्हटले. त्यानंतरही टोळक्याने इम्रानला मारहाण केली. या दरम्यान, एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या टोळक्याला पिटाळून लावले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव पसरला आहे.

वडिलांसमोर मुलाने धावत्या लोकल समोर मारली उडी, ठाणे स्टेशनवरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...