S M L

कोल्हापूरमध्ये सासऱ्यानं सुनेवर आणि नातवंडांवर शस्त्रानं केला हल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ गावात पाणी तापवण्यावरून एक घरामध्ये वाद झाला. आणि यामध्ये सासऱ्याने सून आणि दोन नातवांवर धारधार शस्त्राने हल्ला केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2018 12:26 PM IST

कोल्हापूरमध्ये सासऱ्यानं सुनेवर आणि नातवंडांवर शस्त्रानं केला हल्ला

कोल्हापूर, 14 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ गावात पाणी तापवण्यावरून एक घरामध्ये वाद झाला. आणि यामध्ये सासऱ्याने सून आणि दोन नातवांवर धारधार शस्त्राने हल्ला केलाय. या हल्ल्यात हे सर्व जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मल्हारपेठे इथे अंघोळीसाठी घरात पाणी तापावण्याच्या कारणातून सातपूते कुटूंबात वाद झाला. वादातून पांडुरंग सातपुते याने सून आणि नातवंडांवर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शुभांगी सातपुते, मयुरेश सातपुते, आणि मनीषा सातपुते हे जखमी झाले आहेत. तसेच पांडुरंग दशरथ सातपुते हे सुद्धा जखमी झाले आहेत.

जखमींना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कळे पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close