मुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या

घाटकोपर पश्चिमेला रविवारी रात्री महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना सोमवारी (15 जुलै) अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 05:54 PM IST

मुंबईत ऑनर किलिंग, 4 महिन्यांची गरोदर होती मुलगी, वडिलांनीच केली हत्या

मनोज कुळकर्णी (प्रतिनिधी),

मुंबई, 15 जुलै- घाटकोपर पश्चिमेला रविवारी रात्री महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना सोमवारी (15 जुलै) अटक केली आहे. आरोपी राजकुमार चौरासीया यानेच आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मीनाक्षी चौरासिया असे मृत तरुणीचे नाव आहे. मीनाक्षी ही 4 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे ऑनर किलिंगचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मिळालेली माहिती अशी की, घाटकोपरच्या नारायण नगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर मीनाक्षीचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. काही रिक्षा चालकांना हा मृतदेह फुटपाथवर आढळला होता. माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनीही पाहणी केली होती. दरम्यान, शुक्रवारी (12 जुलै) रात्री देखील घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरूणाची हत्या झाली होती. सलग दुसरी हत्येची घटना समोर आल्याने घाटकोपर हादरून गेले आहे.

सुरक्षारक्षकाचा 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाची काढली विवस्र धिंड

विरारमध्ये सुरक्षारक्षकानेच 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहानी असे नराधमाचे नाव असून संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन त्याची विवस्र धिंड काढली. नंतर त्याला अर्नाळा सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading...

नराधम हा पीडित बालिकेच्या बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. मात्र, त्यानंतर तो फरार होता. स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेऊन आता त्याची विवस्र धिंड काढली. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...