वाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून बापलेकाचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सावळी येथे विजेचा धक्का लागून बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. दत्ता गवळी व विजय गवळी हे दोघे बापलेक शेतात शिमला मिरचीला पाणी देत होते.

  • Share this:

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 11 जून- जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सावळी येथे विजेचा धक्का लागून बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. दत्ता गवळी व विजय गवळी हे दोघे बापलेक शेतात शिमला मिरचीला पाणी देत होते. तेव्हा विद्युत प्रवाह पाण्यात उतरला आणि शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला. दत्ता गवळी यांच्या कुटुंबीयांकडे 2 एकर शेती असून सर्व कुटुंबीयाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.

दत्ता गवळी व विजय गवळी यांच्या मृत्यू पश्चात कुटुंबात दत्ता गवळींची पत्नी कांताबाई गवळी व लहान मुलगा अजय गवळी आहे.घरातील दोघ्या कर्त्या पुरुषांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबासह सावळी गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेचा तपास पोलीस करत असून मृतकाच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे 3 बळी

राज्यातील अनेक भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे नाशिक जिल्ह्यात 2 दिवसामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे बाळू देवराम सावंत यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. येवला तालुक्यातील आडगाव येथे चोथवा गावात लताबाई शिवराम आहेर या महिलेच्या अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. याशिवाय निफाड तालुक्यातील काथरगाव येथे द्वारकाबाई माणिक रणपिस या महिलेचा देखील अंगावर भिंत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असला तरी राज्यात मात्र त्याची प्रतिक्षा कायम आहे. पण, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाची हजेरी पाहायाला मिळत आहे. कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात मागील दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात विजांचा गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही भागांमध्ये त्यामुळे वीज देखील गेली. सध्या राज्यात भीषण दुष्काळ असून अनेकांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहेत.


SPECIAL REPORT : जमावाची पोलिसाला गाडीत घुसून मारहाण, डोळाही फोडला

First published: June 11, 2019, 4:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading