महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट', लग्नाआधीच वडील आणि भावाकडून मुलीच्या प्रियकराचा खून

महाराष्ट्रात प्रेमप्रकरणातून हल्ला किंवा हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 08:03 AM IST

महाराष्ट्रात पुन्हा 'सैराट', लग्नाआधीच वडील आणि भावाकडून मुलीच्या प्रियकराचा खून

चंद्रपूर, 13 मे : वडील आणि भावाने मुलीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. योगेश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस इथला रहिवासी होता.

योगेश जाधव या घुग्घुस येथील तरुणाचे घुग्घुस येथील मुलीसोबत प्रेमसंबध होते. योगेशला रविवारी त्याच्या मैत्रिणीने भेटायला बोलवलं. पण मुलीसोबत भेट होण्यापुर्वी प्रभुदास धुर्वै आणि क्रिष्णा धुर्वै या पितापुत्राने चारगाव इथून योगेशला बळजबरीने मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर यवतमाळ जिल्हयाच्या हद्दीत निलजईच्या जंगलात त्याला बेदम मारहाण करुन दगडाने ठेचून योगेशची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी पिता प्रभुदास धुर्वै आणि पुत्र क्रिष्णा धुर्वै पुत्राने रात्री उशिरा घुग्घुस पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढील कारवाई करत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात प्रेमप्रकरणातून हल्ला किंवा हत्या होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीतही एका युवकावर हल्ला करण्यात आला. उच्चजातीत प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीचा भाऊ आणि चुलत्याने तरुणावर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पुण्यातील चांदणी चौकात ही धक्कादायक घटना घडली.

या घटनेत तुषार पिसाळ (20) याला पोटात आणि छातीत 4 गोळ्या लागल्या आहेत त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषारची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Loading...


मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2019 08:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...