S M L

...जेव्हा कोसळतो पाऊस !

कोकणात गेले काही दिवस धो धो पाऊस कोसळतोय. लावणी करता मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 25, 2018 03:11 PM IST

...जेव्हा कोसळतो पाऊस !

महाराष्ट्र, 25 जून : कोकणात गेले काही दिवस धो धो पाऊस कोसळतोय. लावणी करता मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे.  पावसामुळे भात लावणीला आता वेग आला आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं आठ दिवस आधी हळव्या भात रोपांची लावणी सुरू झाली आहे.

चांगल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भात लावणीला सुरूवात झाली आहे. भाताची रोपंसुद्धा चांगलीच तयार झाली आहेत. कोकणातील जमीन पाणी धरून ठेवत नाही, त्यामुळे चांगला पाऊस पडल्यावर चिखल करून भात लावला जातो.

हेही वाचापाथर्डीमध्ये एसटी चालकाला मारहाण, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

लष्कराच्या 'हिटलिस्ट'वरच्या आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा

क्रूर आईने 10 महिन्याच्या बाळाला पाण्याच्या पिंपात टाकून मारलं !

Loading...
Loading...

सध्या पडत असलेला पाऊस भात पिकाला चांगला फायदा देणारा आहे, तर दुसरीकडे वेळेआधी विदर्भात दाखल झालेल्या पावसाने दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलं आहे.

यावर्षी पाऊस चांगला पडेल अस अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता पण दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जुनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात दोन-तीन वेळा आलेल्या दमदार पावसामुळे पहिल्या टप्प्यात कापूस, सोयबीनच्या बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत पण पाऊस गायब झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. पण आता पावसाच्या सरींनी शेती जशी फुलली आहे तसेच शेतकरी देखील खूश झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 01:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close