S M L

बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट !

बोंडअळी प्रतिबंधक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे

Renuka Dhaybar | Updated On: Jun 27, 2018 08:07 AM IST

बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट !

मुंबई, 27 जून :  बोंडअळी प्रतिबंधक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेनं व्हॉट्सअॅपचा आधार घेतला आहे. ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपर्यंत बीटी कपाशीच्या भोवती नॉन बीटी कपाशीची लागवड करावी, ज्यामुळे बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहचवण्यात येतोय.

गेल्या वर्षीही असाच संदेश देण्यात आला होता, पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं होतं, असं झेडपीच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे. कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

या संदर्भात जि. प. कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल हा कपाशी पिकाच्या उत्पादनाकडे अधिक आहे. गेल्या वर्षी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी बीटी कपाशी भोवती नॉन बीटी कपाशीच्या सरी पेराव्यात, असे आवाहन केले होते; पण त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. यंदा यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

Loading...
Loading...

कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या मेळाव्यामध्येही या संदर्भात कृषी निविष्ठांची खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना नॉन बीटी कपाशीच्या लागवडीसंदर्भात सांगण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले.

व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून जागृती

यावर्षी व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदेश पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत २ हजार ५०० कृषी सेवा केंद्र असून, यापैकी कार्यरत १५०० केंद्र आहेत. पेरणीच्या हंगामात या कृषी सेवा केंद्रांचा आणि शेतकऱ्यांचा जवळचा संबंध येत असतो.

हेही वाचा...

भाजपच्या नगरसेवकाची आळंदीत भरदिवसा हत्या

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

VIDEO : वडाळ्याच्या भूस्खलनाचा थरार!

आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 08:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close