S M L

शेतकरी 1 मार्चपासून पुन्हा संपावर

रामीण भागातून कोणतीच गोष्ट शेतकरी शहरात येऊ देणार नाही असा इशाराही रघुनाथ दादा पाटील यांनी दिलाय.

Sachin Salve | Updated On: Dec 22, 2017 05:15 PM IST

शेतकरी 1 मार्चपासून पुन्हा संपावर

22 डिसेंबर : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. 1 मार्चपासून शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिलाय.औरंगाबादमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संप करणार असल्याची  घोषणा शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी औरंगाबादमध्ये केली. शेतकरी यांच्या ज्या विविध मागण्या होत्या त्याची सरकारने पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला. त्यामुळे 1 मार्चपासून पुन्हा शेतकरी असहकार आंदोलनात जातील आणि शेतकरी शासन आणि नागरिकांना सहकार्य करणार नाही. ग्रामीण भागातून कोणतीच गोष्ट शेतकरी शहरात येऊ देणार नाही असा इशाराही रघुनाथ दादांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2017 05:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close