पाऊस पडत नाही, या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

मागचे दिवस आणखी पुढे येतात की काय, या भीतीने केज तालुक्यातील वाघे बाबळगाव येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 05:49 PM IST

पाऊस पडत नाही, या भीतीने शेतकऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

बीड, 27 जुलै- पावसाळ्याचे तब्बल दोन महिने उलटले मात्र पाऊस पडत नाही. खत, बियाणाचा जुगार खेळला पीक जोमात पण पाऊस पडायचे नाव घेईना. शिवार सुकतोय दिवसेंदिवस परस्थिती बिकट होत चालली आहे. मागचे दिवस आणखी पुढे येतात की काय, या भीतीने केज तालुक्यातील वाघे बाबळगाव येथील शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सज्जन महादेव घायाळ (वय- 42) असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतीमध्ये आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मंदाकिनी सज्जन घायाळ व दोन मुले आहेत.

एकीकडे मुंबईसह पुणे, कोकणात पावसाने थैमान घातले असताना मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि अजून अद्यापही पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं नावच घेत नाही.

कन्येच्या विवाहावरील खर्च टाळत मुख्यमंत्री मदत निधीला पाच लाखांची रक्कम

दरम्यान, राज्याचे माजी मुख्य सचिव तथा लोकपाल सदस्य दिनेश कुमार जैन यांनी कन्येच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळत बचत झालेली पाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीला दिली. काल नवी दिल्ली येथे झालेल्या विवाह समारंभात नवदाम्पत्याला आर्शिवाद देण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी नवदाम्पत्य श्रेया आणि सबरीश यांच्या हस्ते पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

Loading...

ही रक्कम शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील विधवा महिलांच्या कल्याणासाठी वापरावी असे आवाहन श्रेया जैन यांनी केले. प्रत्येकाने अशा प्रकारे विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्चात बचत करीत सामाजीक दायित्व म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन दिनेश कुमार जैन यांनी केले.

तब्बल 17 तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधला पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...