आशिष देशमुखांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच शेतकऱ्याची आत्महत्या

आशिष देशमुखांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच शेतकऱ्याची आत्महत्या

दोन दिवसांपूर्वी मधुकर धोटे या गारपीटग्रस्त शेतकऱ्यानेही काटोल परिसरात आत्महत्या केली होती.

  • Share this:

19 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या वतीने आंदोलन होत असतांना एका शेतकऱ्याने आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागेच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळाली नसतांना गारपिटीने रब्बीच्या पिकांसोबतच संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भाजपचे आमदार गेल्या आठवड्याभरापासून उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनावर बसले आहे. पण आमदारांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपाच्या मागे दिलीप लोहे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

दोन दिवसांपूर्वी मधुकर धोटे या गारपीटग्रस्त शेतकऱ्यानेही काटोल परिसरात आत्महत्या केली होती. त्यातच आज प्रहार संघटनेचे कार्यकर्ते काटोलच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनावर बसले आहेत. पण आज आत्महत्या व्यक्तीचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय होता तो शेतकरी नसल्याच नागपूर ग्रामीण पोलिसांचं म्हणणं आहे.

गेल्या आठवडाभरापासून जरी नागपूर जिल्ह्यात आंदोलन होत असली तरी सरकारी दरबारी शेतकरी उपेक्षितच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2018 10:45 PM IST

ताज्या बातम्या