संपाच्या दुसऱ्या दिवशी बळीराजाचा उद्रेक

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2017 11:55 AM IST

संपाच्या दुसऱ्या दिवशी बळीराजाचा उद्रेक

02 जून : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. आजही राज्यात ठिकठिकाणी आंदोलकांनी शहरांकडे येणारं दुध आणि भाजीपाला रोखून धरलं आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून संपकऱ्यांची धरपकड सुरू आहे. तसंच महागाईचीही टांगती तलवार शहरवासियांच्या डोक्यावर आहे.

यात सटाण्यातील व्यावसायिकांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत नामपूरमध्ये कडकडीत बंद पाळला आहे तर जायखेडासह तालुक्यातील अन्य आठवडे बाजारहीबंद ठेवण्यात आले. चंदगडमध्ये रस्त्यावर फळं फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

बारामतीत दूध संकलन केंद्र बंद पाडून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर आठवडा बाजारही बंद करण्यात आला. पैठणमध्ये शेतकरी संघनेने पुढाकार घेत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. तर शिर्डीत शेतकऱ्यांनी भजन आंदोलन करत सरकारी धोरणांचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...