Elec-widget

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे

शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे

मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • Share this:

03 जून : किसान क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ऐतिहासिक शेतकरी संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी  तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

31 ऑक्टोबर पर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, 22 जून पर्यंत दूध दरवाढ आणि हमीभावपेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याचं आश्वासन या प्रमुख मागण्या तत्वतः मंजूर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी केवळ या आश्वासनावर समाधान मानत ऐतिहासिक शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.

शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत, त्यामुळेच आम्ही गेली 2 दिवस सुरू असलेला संप मागे घेत आहोत अशी भूमिका किसान क्रांती मोर्चाचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी मांडली. सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं आणि हमीभावाचा कायदा पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं आहे. जर आमच्या सर्व मागण्या 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन पुकारू असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ आश्वासनावर समाधान मानणारे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सरकारला फितूर असल्याचा आरोप करत आम्ही हा संप सुरू ठेवणार असल्याच किसान सभेचे अजित नवले यांनी सांगितले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन दिलं असून ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचही नवले म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवावा अस आवाहनही त्यांनी केलं.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अर्ध्यातूनच उठून गेलेले अजित नवले हे किसान क्रांती मोर्चाच्या कोर टीमचे मेंबर नव्हते, त्यामुळे त्यांची भूमिका अधिकृत नाही असे स्पष्टीकरणही सूर्यवंशी यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...