पुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं

पुणतांब्यात शेतकऱ्यांनी सरकारचं घातलं दहावं

पुणतांब्यात आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारचं दहावं घातलंय. त्याचप्रमाणे बारामतीत पांरपरिक पद्धतीनं जागरण -गोंधळ घालण्यात आला.

  • Share this:

06 जून : शेतकरी संपाचा 6 वा दिवस असल्यानं  काही ठिकाणी शेतकरी आक्रमक होत आंदोलन करताना दिसले. शेतकऱ्यांची  सरकारविरोधाची धार कायम दिसतेय. पुणतांब्यात आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी सरकारचं दहावं घातलंय. त्याचप्रमाणे बारामतीत पांरपरिक पद्धतीनं जागरण -गोंधळ घालण्यात आला.

सोलापुरात रास्तारोको

आज सहाव्या दिवशीही शेतकरी संपाचा वणवा कायम राहिला. सोलापूर- विजापूर बायपास महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं. दुधाचा कॅन आणि जनावरांसह शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

टाळे ठोकून निषेध

आंदोलकांनी आज शासकीय कार्यालयांना टाळे ठोकून सरकारचा निषेध केला. नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, वाशीम या जिल्ह्यात हे टाळे ठोको आंदोलन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी आठवडे बाजारही बंदच आहेत. सांगलीमध्येही आंदोलनं सुरू आहेत.

माजी आमदार कार्यकर्त्यांसह ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यातील नेवाश्यातही तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी माजी आमदार शंकरराव गडाख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गेटवरच रोखलं. त्यामुळे आंदोलकांनी गेटवरच ठिय्या आंदोलन केलं.

जालन्यात आठवडी बाजार बंद

जालन्यामध्ये शेतकरी संपाच्या आजच्या सहाव्या दिवशी जाफराबाद तालुक्यातला सर्वात मोठा आठवडी बाजार शेतकऱ्यांनी बंद पाडला. जाफराबादच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी आंदोलकांनी दुग्धाभिषेक घातला. या आंदोलनात जाफराबाद, टेंभुर्णी, वरूड, पिंपळखुटा, निमखेडा, कुंभारझरी, हिवराबळी इथल्या 150 ते 200 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 06:57 PM IST

ताज्या बातम्या