News18 Lokmat

शेतकऱ्यांचा संप सुरू; 'वारणा'चे ट्रक फोडले!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 1, 2017 01:18 PM IST

शेतकऱ्यांचा संप सुरू; 'वारणा'चे ट्रक फोडले!

01 जून : शेतकऱ्यांच्या संपाला काल (बुधवारी) मध्यरात्रीपासून सुरुवात झाली असून शेतकरी संपाची पहिली ठिणगी सातारा जिल्ह्यात पडली आहे. साताऱ्यात शेतकरी संघटनेने कोल्हापूरहून मुंबईला जाणारी दूध वाहतूक रोखून धरीत वारणा दूध डेअरीच्या दोन ट्रकची तोडफोड केली आहे.

कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देणं शक्य होणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानं शेतकरी आणि राज्यसरकार यांच्यातील मंगळवारी रात्री झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर काल मध्यरात्रीपासून या संपाला सुरूवात झाली असून राज्यात काही भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. मुंबई तसंच, बाकीच्या शहरांच्या होणाऱ्या शेतमालाचा पुरठा रोखण्यासाठी काही ठिकाणी गाड्या फोडल्याची घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, भाजपा सरकारची कोंडी करण्यासाठी शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रहर संघटना, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शेतकरी संपाच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...