News18 Lokmat

शेतकऱ्याच्या मुलाची भारताच्या क्रिकेट टीममध्ये निवड

दिल्लीमधील भारतातील ८०० क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चाचणी घेण्यात आली. त्यात केवळ १७ मुलांची निवड करण्यात आली

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 27, 2017 11:36 AM IST

शेतकऱ्याच्या मुलाची भारताच्या क्रिकेट टीममध्ये निवड

27 ऑक्टोबर: शेतकऱ्याचा मुलगा नेहाल शांताराम खडसे या शेतकरी पुत्राची भारताच्या "इंडियन नॅशनल अंडर १९ क्रिकेट टीम "साठी निवड झाली. दिल्लीमधील भारतातील ८०० क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चाचणी घेण्यात आली. त्यात केवळ १७ मुलांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्रातून अमरावती जिल्ह्यातील अऱ्हाड -कुऱ्हाड या छोट्याश्या गावातील शेतकरी पुत्र नेहाल शांताराम खडसे याची अंडर 19 भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. अत्यंत जेमतेम परिस्थिती असलेल्या नेहाल हा अकराव्या वर्गात शिकत असून , वयाच्या दहाव्या वर्षांपासून क्रिकेट खेळयाला त्याने सुरुवात केली. सुरुवातीला आई वडिलांनी नेहालच्या खेळाकडे दुर्लक्ष केलं मात्र मुलाची आवड पाहून परिस्थिती नसताना शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून उसने पैसे घेऊन त्यांनी नेहालला मुंबई येथील क्रिकेट परफॉर्म पॉईंटमध्ये सराव करायला पाठवले. या अकॅडेमीचे आरिफ हुसेन यांनी नेहालला क्रिकेटचे धडे दिले. नेहालनेही जिद्दीने सराव केला. श्रीलंका येथे होणाऱ्या भारतीय टीममध्ये नेहालची विकेट किपर म्हणून निवड झाली.

विशेष म्हणजे या टीमचे कोच राहुल द्रविड आहेत , श्रीलंकेतही टीम २ वन डे, १ टेस्ट व तीन २०-२० मॅचेस खेळणार आहेत. याच संघातून जुनियर आय पी एल व नंतर चांगला परफॉर्मंन्स करनाऱ्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय आय पी एल साठी निवड केली जाणार आहे. नेहालची आई व त्याच्या मित्रांना नेहाल सचिन तेंडुलकर सारखा मोठा क्रिकेटर व्हावा असे वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...