S M L

पणन अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला?

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2017 11:37 AM IST

पणन अधिकारी आणि व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला?

25 एप्रिल : नाफेडनं आतापर्यंत खरेदी केलेली निम्यापेक्षाही जास्त तूर ही व्यापाऱ्यांची असल्याचं आता उघड होतंय. सहकार विभागाचे अधिकारी, नाफेड तसच पणन अधिकारी आणि व्यापारी यांच्या संगनमतानं शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला मारल्याचा आरोप खुद्द शेतकरी करतायत.

नाफेडनं कधी बारदाण्याच्या नावाखाली तर तांत्रिक कारणं देत तुर खरेदी थांबवली. पैशासाठी अवघडलेल्या शेतकऱ्यांना मग व्यापाऱ्यांशिवाय पर्याय राहीला नाही. व्यापाऱ्यांनी 3 ते साडे तीन हजार रूपये क्विंटलनं शेतकऱ्यांची तूर घेतली आणि तीच तूर नाफेडला पाच हजार रूपये एवढ्या हमी भावानं विकली. त्यामुळेच शेतकऱ्यांची जवळपास 10 लाख टन तूर अजूनही पडून आहे. आताही व्यापारी शेतकऱ्यांच्या तुरीवर डोळा ठेवून असल्याचं दिसतंय.

22 तारखेपर्यंत आलेली तूर खरेदी करणार असल्याच्या निर्णयाने केंद्राकडून घेण्यात आल्यानं नाफेड केंद्रावरील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. आता लवकरात लवकर तूर खरेदी करून शेतकऱ्यांना मोकळं करावं अशी मागनी नाफेड केंद्रावर महिन्याभरापासून ताटकळत असलेले शेतकरी करत आहेत.

दरम्यान, आज कॅबिनेटमध्ये तुरीचा मुद्दा येण्याची शक्यता आहे. त्याच्यापुर्वी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाष देशमुख यांचीही बैठक होणार आहे. तुरबंदीच्या पर्यायावर विचार केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 11:37 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close