संपात फूट पडल्याने राज्यात अजूनही ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच

संपात फूट पडल्याने राज्यात अजूनही ठिकठिकाणी आंदोलनं सुरूच

  • Share this:

04 जून : चौथ्या दिवशीही राज्यभरातले शेतकरी आक्रमक आहेत. राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच आंदोलनं करायला सुरूवात केलीय. जुन्नर, नगर, शिर्डी, इंदापूर अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली. अहमदनगरला कर्जत तालुक्यात शेतकरी संघटना संपावर ठाम आहेत. कर्जतमध्ये शेतकऱ्यांनी आज सकाळी पुन्हा आंदोलन केलं. दुधाचा टॅकर सोडून गावातील रस्त्यांना दुग्धाभिषेक घालून आपला निषेध व्यक्त केला. जयाजी सुर्यवंशी आणि सदाभाऊ यांचा पुतळा जाळला.

नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरेत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.. डाळ आणि कांद्याचा ट्रक आंदोलकांनी फोडला तर कोथिंबीर, काकडीचा ट्रकही रिकाम केला. जुन्नरमधील शेतकरी पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.. तर मनमाडमध्ये बाजार समितीत काही प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे. तर नाशिक पुणे महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन करत टोमॅटो, डाळ रस्त्यावर फेकला आणि सरकारचा निषेध केला. इंदापूरात शेतकऱ्यांनी आठवडी बाजार बंद पाडला. शेतकऱ्यांनी इंदापूर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर भाजीपाला टाकून आणि दूध ओतून आपला निषेध नोंदवला.

लोणंद-शिरवळ रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करून संप सुरूच ठेवला. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा संप सुरुच आहे. निघोज, जवळ्यात, शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतलं. बंदमुळे दूध डेअरी चालकांनी दूध घेतलं नाही. शेतकऱ्यांनी दूध ओतून संपात सहभाग नोंदवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या