शेतकरी संघटनेचा सरकारला अल्टीमेटम, नाहीतर शहराचा पुरवठा बंद करू !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2018 06:44 PM IST

शेतकरी संघटनेचा सरकारला अल्टीमेटम, नाहीतर शहराचा पुरवठा बंद करू !

मुंबई, 02 जून : 7 जूनपर्यंत आम्ही वाट पाहणार आणि सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यातील शेतकऱ्यांना सांगून शहरात दूध आणि भाजीपाला येऊ देणार नसल्याचा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय.

शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. मात्र, सरकार दरबारी अजूनही शेतकऱ्यांच्या संपाची दखल घेण्यात आली नाही. मागे लाँगमार्चच्या वेळी सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. मात्र त्यांची कोणतीही आश्वासनाची पूर्तता सरकारनं केली नाही. दूधाच्या संदर्भात देखील काहीही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे पाच जूनला पुन्हा एकदा शेतकऱी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा  अजित नवलेंनी दिलाय.

तसंच अतिरिक्त साखर असताना पाकिस्तानातून साखर आणली जातेय. मोझांबिकमधून तूर आणली जातीये तर गुजरात, कर्नाटकातून दूध आणलं जातंय. पण आम्हाला न्याय दिला जात नाही.  या तिन्ही गोष्टी राज्यभरातल्या तहसील कार्यालयातून देवेंद्र फडणवीस यांना पाठवले जाईल असंही नवलेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2018 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...