'फडणवीस सरकारने विश्वासघात केला', रक्ताळलेले पाय पुन्हा विधानभवनावर धडकणार

मागील वर्षीही हजारो शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईला आले होते. सरकारने आश्वासन दिल्यानंतर हे शेतकरी पुन्हा परतले.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 10:22 AM IST

'फडणवीस सरकारने विश्वासघात केला', रक्ताळलेले पाय पुन्हा विधानभवनावर धडकणार

प्रशांत बाग, नाशिक, 20 फेब्रुवारी : 'फडणवीस सरकारने आमची फसवणूक केली,' असं म्हणत शेतकरी पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत. आज निघणाऱ्या या लाँग मार्चमध्ये 40 हजार शेतकरी सहभागी होणार असून ते 27 फेब्रुवारीला विधानभवनावर धडक देतील, अशी माहिती आहे.

मागील वर्षीही हजारो शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईला आले होते. सरकारने आश्वासन दिल्यानंतर हे शेतकरी पुन्हा परतले. पण शेतकरी दिलेली आश्वासने पूर्ण न करून आमचा विश्वासघात केला आहे, अशी भूमिका घेत किसान महासभेने पुन्हा एकदा एल्गार केला आहे.

शेतकऱ्यांच्या या नियोजित लाँग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर फक्त एकत्र जमून धरणे-आंदोलन करायला मुंबई नाका भागात परवानगी देण्यात आली आहे. पण कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा हा लाँग मार्च निघणारच, अशी भूमिका किसान महासभेनं घेतली आहे. पोलीस स्थानबद्द करतील या भीतीने किसान सभेचे प्रमुख नेते भूमिगत झाले आहेत.

ऐन वेळी गनिमी काव्याने मुंबई नाका परिसरात येण्याचा या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, मागील वर्षी 6 मार्चला नाशिकहून शेतकऱ्यांचा महामोर्चा  मुंबईकडे आला होता. जवळजवळ 30 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाल होते.

Loading...

काय होत्या या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा

-  विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या

- शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा

- वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

- बोंडअळी, गारपीटग्रस्तांना एकरी 40 हजारांची भरपाई द्या

- वीजबिल माफ करा

- दुधाला किमान 40 रु. लीटर भाव हवा


VIDEO : युतीनंतर सोमय्यांविरोधातील आक्रमक शिवसैनिक थेट मातोश्रीवर, उद्धव ठाकरे म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...