नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या ऐतिहासिक लाँग मार्चमध्ये 20 हजार शेतकरी सहभागी

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लॉंग मार्च घोटीपर्यंत पोहचला आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2018 02:31 PM IST

नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या ऐतिहासिक लाँग मार्चमध्ये 20 हजार शेतकरी सहभागी

07 मार्च : नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लॉंग मार्च घोटीपर्यंत पोहचला आहे. किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

काल नाशिक येथील सीबीएस चौकातून निघालेला हा लॉंग मार्च सहा दिवस पायी चालून १२ मार्च रोजी मुंबईत पोहोचणार आहे. यामध्ये 20 हजार शेतकरी सहभागी झाले आहेत..मुंबई येथे पोहचल्यावर विधान भवनाला बेमुदत महाघेराव घालण्यात येणार असल्याची घोषणा किसान सभेने केली आहे.

कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा, शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या, स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्या, बोंड आळी आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई द्या, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा,अशा विविध मागण्यांसाठी हा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व. डॉ. अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत,किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले आदी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2018 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...