जळगावात अंगावर वीज पडून शेतकरी गंभीररित्या भाजला

अंगावर वीज पडल्याने शेतकरी गंभीररित्या भाजल्याची घटना घडली आहे. दापोरा शिवारात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 02:19 PM IST

जळगावात अंगावर वीज पडून शेतकरी गंभीररित्या भाजला

जळगाव, 12 जून- अंगावर वीज पडल्याने शेतकरी गंभीररित्या भाजल्याची घटना घडली आहे. दापोरा शिवारात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. जखमी शेतकऱ्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिंटू भगवान कोळी असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पिंटू कोळी हे शेतात मशागत करत असताना अचानक वीज अंगावर पडली. यात शेतकरी थोडक्यात बचावला असून गंभीररित्या भाजला गेला आहे. शेतकऱ्याचा कान आणि पाय भाजले गेल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे. त्यांचे कान आणि पाय भाजले गेले आहेत. त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश..

भडगाव तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पीकाचे मोठे नुकसान केले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. मंगळवारी दुपारी जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बातसर, लोण पिराचे या गावात झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्री महाजन यांनी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

पुढच्या 48 तासांत मुसळधार पावसामुळे 'या' गावांना धोका

Loading...

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासात रायगड, कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड जिल्हा प्रशासन व आपत्ती प्रशासनाने किनारपट्टीच्या गावांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मच्छीमारी नौकानांही समुद्रात जाण्यास बंदी घातली आहे.

समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या किनारपट्टीवरील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्रात कमी दबावाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारांना पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल पडलेला पाऊस हा वळवाचा पाऊस होता. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.


Cyclone Vayu: चक्रीवादळाची गुजरातकडे वेगानं कूच, पोरबंदरहून थेट ग्राऊंड रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 02:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...