S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी संपावर ठाम!

Samruddha Bhambure | Updated On: May 31, 2017 10:00 AM IST

मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली, शेतकरी संपावर ठाम!

31 मे : नगर जिल्ह्यातल्या पुणतांबे गावातल्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरली.  शेतकऱ्यांनी  1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतून समाधान झाल्याने शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत.

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकऱ्यांचा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी भेट देऊन आंदोलनाच्या नेत्यांना चर्चेसाठी मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत शिष्टमंडळाची बैठक झाली.

यावेळी सरकारने कर्जमाफीचे लेखी आश्वासन द्यावं, ही मागणी शिष्टमंडळाने लावून धरली. या मुद्यावर निर्णय झाल्याशिवाय पुढे चर्चाच होणार नाही, अशी शिष्टमंडळाची अट होती. परंतु सरसकट कर्जमाफी शक्य नसून, थकबाकीदार शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देऊ, या आपल्या पूर्वीच्या आश्वसनावर मुख्यमंत्री ठाम राहिले.शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या उत्तरावर शिष्टमंडळाचे समाधान न झाल्याने शिष्टमंडळ बैठकीतून बाहेर पडले. आम्हाला आज मदत हवीय, नंतर मदत मिळून काय उपयोग? असं म्हणत शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे.

दरम्यान, एक जूनपासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाच्या वतीने मनमाड येथील शेतकऱ्यांनी प्रभात फेरी काढली. तालुक्यात ठिकठिकाणी किसान क्रांती संघटना, ग्रामपंचायत कार्यालय यांनी जनजागृती प्रभात फेरी काढून संपाच्या काळात शेतीमाल विक्रीस आणू नये असं आवाहन करण्यात येतय. या काळात,ग्रामपंचायत कार्यालय व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने ही प्रभात फेरी काढण्यात आली होती. जनजागृती फेरीत पंचक्रोशितील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2017 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close