S M L

नुकसान भरपाईसाठी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी रोखला नागपूर-मुंबई महामार्ग

नागपूर- मुंबई महामार्ग शेतकऱ्यांनी रोखलाय.भाजप आमदार आशिष देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2018 12:04 PM IST

नुकसान भरपाईसाठी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी रोखला नागपूर-मुंबई महामार्ग

13 फेब्रुवारी : मराठवाडा, विदर्भातले गारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक झालेत. आज सकाळपासून नुकसान भरापाईसाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. नागपूर- मुंबई महामार्ग शेतकऱ्यांनी रोखलाय.भाजप आमदार आशिष देशमुखांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.

अमरावती-नागपूर महामार्गावरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. इथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर संत्री फेकून सरकारचा निषेध केला. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत.

मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे सध्या पिक काढणीचे दिवस असून गहू, ज्वारी, हरभरा सोंगणे आणि मळणी यंत्रातून काढणीचे दिवस आहेत आणि अशातच बळीराजावर अवकाळी पावसाचे संकट कोसळले.  परिणामी हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून जात असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close