S M L

आॅनलाईन कर्जमाफी फाॅर्मच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू

आता कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरतानाही पुण्यातल्या खेडमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेलाय.

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2017 11:49 PM IST

आॅनलाईन कर्जमाफी फाॅर्मच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू

रोहिदास गाडगे, खेड

11 आॅगस्ट : यापूर्वी नोटबंदीच्या काळात, पीक विमा काढताना रांगेत शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. आता कर्जमाफीचा ऑनलाईन फॉर्म भरतानाही पुण्यातल्या खेडमध्ये एका शेतकऱ्याचा बळी गेलाय.

शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची सक्ती केलीये. पण आता ऑनलाईन फॉर्म भरतानाही शेतकऱ्यांचे जीव जाऊ लागलेत. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील नायफड गावातील शंकर ठोकर यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. ठोकर हे कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी वाडा इथं गेले होते. तिथं रांगेत उभं असतानात ते कोसळले.कर्जमाफीचा फॉर्म सहज आणि सरळ भरता येईल असा दावा सरकारने केला होता. पण हे ऑनलाईन अर्जांची गर्दीही शेतकऱ्यांचे जीव घेऊ लागल्याचं या घटनेनं अधोरेखित होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2017 11:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close