S M L

गारपिटीमुळं शेतीबरोबरच शेतकऱ्यांची घरंही कोसळली; संसाराचा गाडा आता रस्त्यावर

रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले. हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Feb 14, 2018 09:26 AM IST

गारपिटीमुळं शेतीबरोबरच शेतकऱ्यांची घरंही कोसळली; संसाराचा गाडा आता रस्त्यावर

14 फेब्रुवारी : रब्बी हंगामातील पिकांना अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले. हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यातील पिंपळझरी गाव. या गावात 50 घरांच्या वस्तीत सगळीकडे आक्रोश आहे. सगळीकडे भयाण शांतता आहे. निसर्गाच्या कोपातून सावरण्याची चालविलेली धडपड सुरू आहे. पिंपळझरी इथल्या प्रभाकर रेड्डींकरिता कालची संध्याकाळ ,संसार उद्वस्त करणारी ठरली. पत्नी सोबत घरी असताना अचानक वाऱ्यासोबत गारांचा पाऊस पडायला सुरवात झाली आणि घर खाली कोसळलं. मोलमजुरी करणाऱ्या या परिवाराचा संसाराचा गाडा रस्त्यावर आला.

गावतल्या पुष्पां घरघडी यांची 2 एकर शेती आहे. शेती आणि रोजमजुरी यावरच त्यांच्या संसाराचा गाडा सुरू आहे. पण या गारपिटीनं शेतातला चणा, कापूस आणि गहू फस्त केला. आपल्या उध्वस्त पिकांकडे पाहून पुष्पा या अक्षरश: रडकूंडीला आल्या आहेत.

दरम्यान, काल झालेल्या गारपिटीत मोठ्या प्रमाणात घरांसह शेती आणि पिकाचं नुकसान झाल आहे. लोकांची राहण्याची व्यवस्था शाळेत करण्यात आली आहे. एरव्ही मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता आमचा विसर पडल्याचा आरोप शेतकरी करतायत.या गारपिटीमुळे संसार उघड्यावर आलेला शेतकरी सरकारी मदत कधी मिळेल याच्याच प्रतिक्षेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 09:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close