कांदा महागला,पण शेतकरी सुखावला

राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Aug 6, 2017 12:16 PM IST

कांदा महागला,पण शेतकरी सुखावला

प्रतिनिधी, 06 आॅगस्ट : टॉमेटोपाठोपाठ आता राज्यात कांद्याच्या भावातही मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव गगनाला भिडण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य या भाववाढीनं आणखी त्रस्त झाले आहेत. सटाणा तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याला शनिवारी सर्वाधिक २,७७५ रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला. कमीत कमी भाव १,१०५ तर सरासरी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला.

सध्या मनमाडसह येवला, मालेगाव, चांदवड, नांदगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी २३०० रुपये प्रती क्विंटल अर्थात २३ रुपये किलो भाव मिळतोय. गेल्या 2 वर्षानंतर कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. सध्या किरकोळ बाजारात ३० ते ३२ रुपये किलो दरानं कांदा मिळतोय. कांद्याच्या भावात ही वाढ झाली नाही तर कांद्याला योग्य भाव मिळत असून असाच भाव नेहमी मिळाला तर शेतकऱ्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही असं मत पुंडलिक कातकाडे या शेतकऱ्याने व्यक्त केलं

पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक २,६६७ रुपये भाव जाहीर झाला. सरासरी भाव २,२५१ रुपये होता. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा आणि धान्य लिलाव 3 दिवस बंद राहाणार आहेत. शुक्रवारी कांद्याला किमान ८००, कमाल २४०० भाव मिळाला होता.

राज्यभर अचानक कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने आठ दिवसांमध्ये बाजारभाव दुप्पट झाले आहेत. २७ जुलैला मुंबई बाजार समितीमध्ये ९ ते १० रुपये दराने विकला जाणारा कांदा गुरुवारी १८ ते २२ रुपये किलो झाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर २० ते ३० रुपये झाले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close