S M L

7 दिवसानंतर दूधाला भाव मिळाला नाही तर आंदोलन चिघळणार, अजित नवलेंचा सरकारला इशारा

सात दिवस आंदोलन शांततेत होईल. त्यानंतरही दूधाला भाव मिळाला नाही तर आंदोलन चिघळणार असा अजित नवले यांचा सरकारला इशारा दिला आहे.

Ajay Kautikwar | Updated On: May 3, 2018 12:01 PM IST

7 दिवसानंतर दूधाला भाव मिळाला नाही तर आंदोलन चिघळणार, अजित नवलेंचा सरकारला इशारा

03 मे: दुधाला दर मिळावा यासाठी आजपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय. शेतकरी शासनाला फुकट दुध देऊन शासनाचा निषेध करणार आहेत. सलग आठ दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांना २७ रुपये प्रतिलिटर भाव हवा आहे. मात्र शासन १५ ते १७ रुपये प्रतिलिटर भावाने दुध खरेदी करतय. आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुका आणि नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याटप्प्याने राज्यभर आंदोलनाची व्याप्ती वाढत जाईल अशी आयोजक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

दरम्यान, सात दिवस आंदोलन शांततेत होईल. त्यानंतरही दूधाला भाव मिळाला नाही तर आंदोलन चिघळणार असा अजित नवले यांचा सरकारला इशारा दिला आहे.

पोटासाठी मर मर मरायचं, काबाडकष्ट करायचे आणि जेव्हा माल घरात येतो तेव्हा मेहनतीचीही कमाई निघत नाही. भाव मिळत नसल्यानं दुध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय. दुधाला योग्य भाव द्या, नाही तर दुध फुकट घ्या असं आंदोलन वैजापूर तालुक्यातल्या लाखगंगा गावच्या शेतकऱ्यांनी केलं आहे.

वैजापुर तालूक्यातील लाखगंगा गावाची उपजिविका चालते ती दुग्धव्यवसायावर. मात्र दुधाला योग्य दरच मिळत नसल्यानं चुल चालवायची कशी असा सवाल शेतकरी करत आहेत. दररोज शंभर लिटर दूध डेअरीत देवून हातात फक्त सतराशे रूपये येतात तर जगायचं कसं असा सवाल लाखगंगाच्या शेतकऱ्यांनी केलाय. या गावातून दररोज जवळपास पाच हजार लिटर दुध डेअरीला जातं. मात्र त्यांना लिटरमागे फक्त 17 ते 19 रुपये मिळतात.

शेतकऱ्याला एका गाईला महिन्याला जवळपास पाच हजार रूपये खर्च येतो. दुधाचे महिन्याला सहा हजार रूपये मिळतात. त्यामुळे सध्या दुधाला असलेला 15 ते 17 रूपये भाव परवडत नाही. 3.5 फॅट असलेल्या दुधाला कमीतकमी 27 रुपये प्रती लिटर भाव मिळावा अशी शेतक-यांची मागणी आहे

Loading...
Loading...

अर्ज विनंत्या करून आमचं कुणी ऐकणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका असून हवालदिल झालेले शेतकऱ्यांनी आजपासून फूकट दूध वाटपास सुरूवात केली आहे. राज्यभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा आयोजकांना आहे. दुध आंदोलनात दुध रसत्यावर ओतले जाते. मात्र यंदा दुधाची नासाडी न करता सरकारला फुकट देण्याची ही गांधीगिरी शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

असं आहे दुधाचं अर्थकारण

  • एका गाईला महिन्याला जवळपास 5 हजार रूपये खर्च
  • दुधातून महिन्याला सहा हजार रूपये मिळतात
  • दुधाला असलेला 15 ते 17 रूपये भाव परवडत नाही
  • 3.5 फॅट असलेल्या दुधाला 27 रुपये प्रती लिटरच्या भावाची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 06:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close