S M L

यवतमाळमध्ये स्वत:चीच चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

पऱ्हाटीची चिता रचून त्यावर स्वतःला झोकून देत शेतकरी माधव यांनी आत्महत्या केली.

Sachin Salve | Updated On: Apr 16, 2018 06:39 PM IST

यवतमाळमध्ये स्वत:चीच चिता रचून शेतकऱ्याने केली आत्महत्या

यवतमाळ, 16 एप्रिल :  जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील एका शेतकऱ्याने पऱ्हाटीची चिता रचून त्यावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकऱ्याच्या या आत्महत्येने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सावळेश्वर येथे राहणारे माधव शंकर रावते(७५) यांची गावातच शेतजमीन आहे. शेतकरी माधव हे शनिवारी(दि. १४) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावाजवळच्या खरीत गेले होते. कपाशी उलंगल्याने पऱ्हाटीचे ढीग शेतात लावून ठेवले होते. त्याच पऱ्हाटीची चिता रचून त्यावर स्वतःला झोकून देत शेतकरी माधव यांनी आत्महत्या केली.

गावातील लोकांना पऱ्हाटीचा ढीग पेटत असल्याचे पाहून घरच्यांना सांगितलं. यावेळी मृतक माधव यांचा मुलगा गंगाधर रावते आणि गावकऱ्यांनी शेतात जाऊन पाहिले तोपर्यंत पऱ्हाटीचा ढीग माधव यांच्यासह पूर्णपणे जळून खाक झाला होता. सदर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 06:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close