कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात 449 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

विदर्भात सर्वाधिक 187, त्याखालोखाल मराठवाड्यात 156 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात 77, पश्चिम महाराष्ट्रात 26, तर कोकणात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 1808 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 09:36 AM IST

कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात 449 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

12 सप्टेंबर: 24 जूनला राज्यातील शेतकऱ्यांच्या माफीची घोषणा करण्यात आली . पण त्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र संपलेलं नाही. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात 449 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

या 449 आत्महत्यांमध्ये  विदर्भात सर्वाधिक 187, त्याखालोखाल मराठवाड्यात 156 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात 77, पश्चिम महाराष्ट्रात 26, तर कोकणात 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान 1808 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हाच आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठा आहे. गेल्यावर्षी 1770 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

कर्जमाफीनंतर ही आत्महत्येचं सत्र सुरूच असलं तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी मात्र सत्ताधारी भाजप शिवसेना आणि घटक पक्ष घ्यायला तयार नाहीत. अगदी दोन्ही कृषीमंत्री आणि सत्तेतले शेतकरी नेतेही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत.

एकूणच कर्जमाफीच्या निर्णयानंतरही शेतकऱ्यांना अजिबात दिलासा मिळालेला नाही. त्यात कर्जमाफीची लांबलेली  प्रक्रिया हा दुष्काळात तेरावा महिना ठरतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 08:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...