S M L

सांगलीत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या

अंजनी येथील द्राक्ष बागायत शेतकरी तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन जालींदर आबासो पाटील (वय ४४) यांनी कर्जास कंटाळून विषारी औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 12, 2017 09:35 AM IST

सांगलीत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची आत्महत्या

सांगली, 12 सप्टेंबर: राज्यातला सुपीक आणि समृद्ध समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीतही एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

अंजनी येथील द्राक्ष बागायत शेतकरी तसेच विकास सोसायटीचे माजी चेअरमन जालींदर आबासो पाटील (वय ४४) यांनी कर्जास कंटाळून विषारी औषध पिऊन राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांच्या द्राक्षशेतीवर सोसायटी आणि बँकाचं असं एकूण १७ लाख रुपये कर्ज आहे.

सलग तीन वर्षाच्या भीषण दुष्काळामुळे टँकरने पाणी विकत घेऊन द्राक्ष बाग जगवण्याचा प्रयत्न जालींदर पाटील यांनी केला होता. यंदाही पाण्याची समस्या भेडसावत असताना द्राक्षबागेची पीकछाटणी करायची कशी हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी विषारी औषध पिऊन आपली जीवनयात्रा संपवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:17 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close