भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने कांदा चाळीतच घेतला गळफास

भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने कांदा चाळीतच घेतला गळफास

एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कांद्याचे घसरलेले भाव यामुळे तात्याभाऊ खैरनार हे संकटात सापडले. यामुळे मग खैरनार या शेतक-याने कांदा चाळीतच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

  • Share this:

बब्बू शेख,नाशिक, 8 डिसेंबर : कांद्याला भाव नसल्याने 44 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन कांदा चाळीतच आत्महत्या केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील भडाणे गावात ही घटना घडली. तात्याभाऊ खैरनार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

तात्याभाऊ खैरनार यांच्यावर बँकांच कर्ज होतं. अशातच कांद्याचे भाव सध्या प्रचंड घसरले आहेत. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने थकीत कर्ज फेडावं तरी कसं, हा प्रश्न खैरनार यांच्यासमोर निर्माण झाला होता.

एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कांद्याचे घसरलेले भाव यामुळे तात्याभाऊ खैरनार हे संकटात सापडले. यामुळे मग खैरनार या शेतक-याने कांदा चाळीतच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.

दरम्यान, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही आत्महत्येचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाही. शुक्रवारीच बीड तालुक्यातील कोळगाव इथल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली . कुंडलिक राधाकिसन कानतोडे (वय 65 असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.

कुंडलिक कानतोडे या शेतकऱ्यावर जिल्हा बँकेचं 3 लाख रुपये एवढं कर्ज होतं. दुष्काळ आणि नापिकीमुळे कुंडलिक कानतोडे हे कर्ज फेडू शकले नाहीत. या कर्जबाजारीपणामुळे अखेर कुंडलिक कानतोडे यांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं.

Loading...

केंद्रांचा दुष्काळ पाहणी दौरा

मराठवाड्यातल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या तीन सदस्यांचं पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. हे पथक शेतकऱ्यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार आहे. त्याचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे. त्यानंतर केद्र सरकार दुष्काळासाठी महाराष्ट्राला किती मदत द्यायची याचा निर्णय घेणार आहे.


बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्यावर गोळी मारणाऱ्याचा हा VIDEO अंगावर शहारा आणेल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...