S M L

सततची नापिकी अन् कर्जाचा वाढता डोंगर..शेतकऱ्याने शेतातच केली आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.संदिपान रामनाथ इके (वय-65) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सुरेश जाधव सुरेश जाधव | Updated On: May 12, 2019 08:24 PM IST

सततची नापिकी अन् कर्जाचा वाढता डोंगर..शेतकऱ्याने शेतातच केली आत्महत्या

बीड,12 मे- माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.संदिपान रामनाथ इके (वय-65) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संदिपान इके यांच्याकडे ग्रामीण बँकेचे कर्ज होते. गेल्या काही दिवसांत पडलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जाचा वाढता डोंगर असह्य झाल्याने चिंताग्रस्त व तनावात ते वावरत होते, असे नातेवाईकांनी सांगितले.

अखेर दुपारी इके यांनी स्वत:च्या शेता शेजारी धुमाळ यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. सर्वांशी मिळून मिसळून राहण्याच्या वृत्तीच्या स्वभावामुळे परिचीत असलेल्या संदिपान इके यांचा दुष्काळामुळे बळी गेल्यामुळे तेलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह झाडावरून खाली उतरवून पंचनामा केला. इके यांच्या पार्थिवावर धारुर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर तेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.



EXCLUSIVE VIDEO: जंगलात पेटला वणवा, 20 हेक्टर जमीन जळून खाक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 12, 2019 08:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close