सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने शेतकऱ्यानं केली आत्महत्या

तिशय मनमिळावू स्वभावाचे दिनकर घुले यांना मागील काही दिवसांपासून पैशांची चिंता सतावत होती.सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने या शेतकऱ्याने कुटुंबातील कुणी नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 10:20 PM IST

सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने शेतकऱ्यानं केली आत्महत्या

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 16 मे- तालुक्यातील चिखली बु इथं दिनकर संभाजी घुले या 55 वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दिनकर घुले या शेतकऱ्याकडे 2 हेक्टर शेती असून दुष्काळामुळे शेतीमध्ये कमी उत्पादन झाले. तसेच त्यांच्यावर 1 लाख रुपयांचं स्टेट बँकेचं कर्ज असल्याचं समजते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे दिनकर घुले यांना मागील काही दिवसांपासून पैशांची चिंता सतावत होती.सततची नापिकी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोईजड झाल्याने या शेतकऱ्याने कुटुंबातील कुणी नसल्याचे पाहून आपल्या राहत्या घरात गळफास घेतला.

तरुण शेतकऱ्याने राहत्या घरीच लावला गळफास

गेल्या आठवड्यात कारंजा तालुक्यातील वापटी येथील संतोष यशवंत लव्हाळे (वय-32) या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. संतोष लव्हाळे या शेतकऱ्याकडे कूपटी येथे गट क्र. 165 मध्ये 1.51 हेक्टर शेती आहे. तो मागील काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्याच्या डोक्यावर बँका तसेच खासगी सावकारचेही कर्ज होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह खरीपाच्या पेरणीची चिंता संतोषला सतावत होती. या नैराश्यामुळे संतोष याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना निवडणूक आचरसंहितेचं कारण देत प्रशासनानं दुष्काळाकडं डोळझाक केली. मात्र, विरोधकांच्या दुष्काळ दौऱ्यानंतर सरकारला जाग आली आहे. पालक सचिवांचे दुष्काळी दौरे सुरु झालेत. मात्र बळीराजांची परवड काही थांबलेली नाही.

Loading...

पावसाळी अधिवेशन होणार मुंबईत

फडणवीस सरकारने यंदाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी उपराजधानी नागपुरात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे विधानभवनाच्या परिसरातही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने ही निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही तयारी नसताना नागपुरात पावसाळी अधिवेशन घेतले, अशी विरोधकांनी जोरदार टीका सरकारवर केली होती. एवढेच नाही तर पावसामुळे अधिवेशनाचे कामकाजच रोखण्याची नामुष्कीही सरकारवर ओढवली होती.


SPECIAL REPORT:सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...