S M L

नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच घडली घटना

केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.

Updated On: Dec 6, 2018 07:47 PM IST

नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच घडली घटना

बीड, 6 डिसेंबर : बीड तालुक्यातील कोळगाव इथल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. कुंडलिक राधाकिसन कानतोडे (वय 65 असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं नाव आहे. केंद्र सरकारचं दुष्काळ पाहणी पथक बीडमध्ये असतानाच कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.

कुंडलिक कानतोडे या शेतकऱ्यावर जिल्हा बँकेचं 3 लाख रुपये एवढं कर्ज होतं. दुष्काळ आणि नापिकीमुळे कुंडलिक कानतोडे हे कर्ज फेडू शकले नाहीत. या कर्जबाजारीपणामुळे अखेर कुंडलिक कानतोडे यांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं.

केंद्रांचा दुष्काळ पाहणी दौरा

मराठवाड्यातल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या तीन सदस्यांचं पथक मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. हे पथक शेतकऱ्यांची भेट घेऊन, प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार आहे. त्याचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे. त्यानंतर केद्र सरकार दुष्काळासाठी महाराष्ट्राला किती मदत द्यायची याचा निर्णय घेणार आहे.

आणखी बातम्या:

Loading...

बाबरी पाडणाऱ्या या कारसेवकाला आज धर्माचीच गरज वाटत नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 07:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close