S M L

पुणतांब्यानंतर आता कानगावहून राज्यव्यापी शेतकरी संप

संपूर्ण परिसरामध्ये चुलबंद ठेऊन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यात येतोय. यासाठी ठिकठिकाणी चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 3, 2017 11:02 AM IST

पुणतांब्यानंतर आता कानगावहून राज्यव्यापी शेतकरी संप

कानगाव, 03 नोव्हेंबर: दौंड तालुक्यातील कानगावमधून शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाला काल सुरुवात झाली आहे. कानगाव येथील मंदिरात शेतकरी, आणि महिलांनी दुधाने ग्रामदेवतेला अभिषेक घालून संपाला सुरुवात केली आहे.

काही महिन्यांपूर्वी कर्जमाफीसाठी नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथून राज्यव्यापी संपाला सुरूवात झाली होती. या संपाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

आता कानगावमधील लोकंही आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारत आहे. शेतकऱ्यांचा दर्जा सुधारावा या आणि अशा अनेक मागण्या कानगावच्या शेतकऱ्यांच्या आहेत. संपूर्ण परिसरामध्ये चुलबंद ठेऊन शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यात येतोय. यासाठी ठिकठिकाणी चक्री उपोषण सुरू करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांनी संप सुरू केल्याने त्यांना दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी कानगाव येथे जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना निवेदनही दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 11:02 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close